नाशिकमध्ये अघोरी तंत्रमंत्राद्वारे तरुणाचा अमानुष छळ

अघोरी तंत्रमंत्राद्वारे तरुणाचा अमानुष छळ करत नरबळीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार, नाशिकमध्ये उघड झालाय.

Updated: Oct 9, 2017, 10:19 PM IST
नाशिकमध्ये अघोरी तंत्रमंत्राद्वारे तरुणाचा अमानुष छळ  title=

नाशिक : अघोरी तंत्रमंत्राद्वारे तरुणाचा अमानुष छळ करत नरबळीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार, नाशिकमध्ये उघड झालाय.

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबासह पीडित तरुणाच्या काकाला ताब्यात घेतलंय. तर भोंदूबाबाची पत्नी आणि पीडित तरुणाची काकी फरार आहेत.

मालेगावच्या माळदे शिवारातली ही घटना आहे. अझरूद्दीन ऐनुद्दीन शेख या १८ वर्षांच्या तरुणाला भूतबाधा झाल्याचं सांगत, त्याचे काका-काकी त्याला रफिकबाबा उर्फ सांडुबाबाकडे घेऊन गेले. बाबानं अझरुद्दीनवर मंत्र-तंत्राचा वापर करत तेल पाजलं, त्याच्या नाकातोंडातही तेलं ओतलं. शिवाय त्याला अमानुष मारहाण केली.

या प्रकाराचा जबर मानसिक आघात झालेल्या अझरुद्दीनवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आघोरी प्रथेचा वापर करुन गुप्तधन मिळवण्यासाठी अझरुद्दीनचा बळी देण्याचं कारस्थान त्याच्या काका-काकींनी रचल्याचा आरोप अझरुद्दीनच्या नातेवाइकांनी केलाय.