भीषण! ट्रॅव्हल्स बसला अपघात, चौघांचा मृत्यू

३१ जण गंभीर जखमी

Updated: Oct 21, 2020, 08:40 AM IST
भीषण! ट्रॅव्हल्स बसला अपघात, चौघांचा मृत्यू  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

नंदुरबार : मृत्यूचा सापळा झालेलल्या नागपूर सुरत मार्गावरील कोंडाईबारी घाटात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरेली एक ट्रॅव्हल्स बस खोल दरीत कोसळली आणि या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातात ३१ जण गंभीर जखमी असून, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

बुधवारी जळगावहून सुरतला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. या बसमधील बहुतांश प्रवासी हे जळगाव जिल्हायतील आहेत. तर, ही अपघातग्रस्त बस गुजरात पासिंगती असल्याचं कळत आहे.  या अपघातामुळं नजीकच्या परिसरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. 

 

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी ही बस जवळपास ४० फूट खोल दरीत कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. सदर अपघाताविषयी माहिती मिळताच पोलीस आणि बचावदलानं घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली. पण, अपघाताचं स्वरुप पाहता यात काहींना आपला जीव गमवावा लागला. तर, गंभीर जखमींचा आकडाही चिंतेत टाकणारा आहे.