८ टन मासे घेऊन जाणारा ट्रक उलटला, मासे लुटण्यासाठी तुफान गर्दी

चालकाचा ताबा सुटल्याने मासे घेऊन जाणारा ट्रक उलटल

Updated: Jun 10, 2018, 11:12 PM IST

नांदेड : चालकाचा ताबा सुटल्याने मासे घेऊन जाणारा ट्रक उलटला आणि ही खबर वा-या सारखी गावात पसरली आणि मासे लुटण्यासाठी परिसरातील नागरिक तुटून पडले. नांदेड शहराजवळच्या कामठा गावाजवळ हा ट्रक उलटला. बंगळूरुमधून मासे घेऊन लखनऊ येथे जाणारा ट्रक पहाटे नांदेड जवळ पोहचला. कामठा बायपास जवळ चालक झोपेत असल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमध्ये मंगलूर कॅटफिश मासे होते. जवळपास ८ टन मासे ट्रकमध्ये होते. ट्रक उलटल्याने जिवंत मासे जवळच्या नाल्यात पडले. ही बातमी परिसरात पसरली आणि मासे लुटण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली.