नांदेड हादरले! पाणी मागितले म्हणून मनोरुग्णाने घेतला दोन जणांचा जीव

Nanded Crime News:  नांदेडमध्ये एका मनोरुग्णाने दोन जणांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात थोडा तणाव निर्माण झाला होता.   

सतिश मोहिते | Updated: May 30, 2024, 01:29 PM IST
नांदेड हादरले! पाणी मागितले म्हणून मनोरुग्णाने घेतला दोन जणांचा जीव title=
Nanded crime news mentally unstable man killed 2 citizen

Nanded Crime News: नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मनोरुग्णाने दोन जणांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीने दोघांच्या डोक्यात फावडा घालून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, या घटनेमुळं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  एका मनोरुग्णाने डोक्यात फावडा घालून दोघांचा खून केला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बुधवारी दुपारी ही घटना घडली. अंबाडी येथे आरोपीच्या घराचे बांधकाम करण्यासाठी मिस्त्री आला होता. दुपारी मिस्त्रीने मनोरुग्ण असलेल्या आरोपीकडे याला पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावरून वाद होऊन आरोपीने याने फावड्याने मिस्त्रीच्या डोक्यावर आणि पोटात मारहाण केली. या मारहाणीत मिस्त्रीचा मृत्यू झाला. 

मिस्त्रीला मारहाण केल्यानंतर आरोपी याने घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या घरात शिरत त्यांच्याही डोक्यात फावडा घातला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मयत व्यक्तीच्या नातेवाईक आणि संतप्त जमावाने त्याचा मृतदेह किनवट पोलीस स्टेशनमध्ये नेला. जमावाने काही वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली होती. या प्रकरणी किनवट पोलिसांनी मृतदेहाची विटंबना आणि बेकायदेशीर जमाव व वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी असलेल्या मनोरुग्ण आरोपीला  पोलिसांनी अटक केली असून त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोर्टाच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

घरगुती वादातून पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या बेतकाठी गावात घरगुती वादातून पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन आरोपी पतीने गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत आरोपीला बांधून ठेवले. कोरची पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत पत्नीचे नाव अमरोतीन बंजार -33 असे असून पती रोहिदास बंजार -37 याने रात्री झोपेतच तिची हत्या केली. हे दाम्पत्य मोल मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यात सतत वाद होत असत. तसंच या दांपत्याला चार मुली आहेत.