नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्प जमीन मोजणी थांबवण्याचे आदेश

राजापूर येथील नाणारच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठीची जमीन मोजणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 24, 2017, 11:19 PM IST
नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्प जमीन मोजणी थांबवण्याचे आदेश title=

रत्नागिरी : राजापूर येथील नाणारच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठीची जमीन मोजणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे आदेश

गेल्या तीन दिवसांपासून जमीनीची मोजणी थांबवावी अशी नाणारवासियांची आणि प्रकल्पबाधिक गावकऱ्यांची मागणी होती. अखेर पालकमंत्री रवींद्र वायकरांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना सूचना देऊन जमीन मोजणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकांपर्यंत प्रकल्पाचे काम आधी पोहोचवा

लोकांपर्यंत प्रकल्पाचे काम आधी पोहोचवण्याच्या सूचना वायकरांनी दिल्या आहेत. तसचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवासेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री रवींद्र वायकरांची बैठक होणार आहे.  बैठकीत निर्णय होईपर्यंत जमीन मोजणी थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत.