सरकारवर किंवा मोदींवर कुठलीही टीका केली - नाना पटोले

भाजप खासदार नाना पटोलेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केल्याच्या वृत्तानं खळबळ उडालीय.

Updated: Sep 2, 2017, 06:51 PM IST
 सरकारवर किंवा मोदींवर कुठलीही टीका केली - नाना पटोले title=

नागपूर : भाजप खासदार नाना पटोलेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केल्याच्या वृत्तानं खळबळ उडालीय. स्वतः नाना पटोलेंनी मात्र सरकरावर किंवा मोदींवर कुठलीही टीका केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. माझ्या विधानाचा विपर्यास झाल्याचंही पटोले यांचं म्हणणं आहे.  

काल नागपुरात आयोजित एका कृषीविषयक कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर मनसोक्त टीका केल्याचं वृत्त आज अनेक वृत्तपत्रांनी छापलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रातले मंत्री घाबरतात असं विधान केल्याची बातमी अनेक वृत्तपत्रांनी छापली. त्यावर उत्तर देताना पटोलेंनी हे विधान केलं नसल्याचं म्हटलं आहे.