नागपुरात दोन जुन्या पुलांमुळे शहरातील रहिवासी त्रस्त

 नागपुरात दोन जुन्या पुलांमुळे शहरातील रहिवासी त्रस्त झालेत. नागपूरमधून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर हा पूल आहे.

Updated: Aug 5, 2017, 08:52 PM IST
नागपुरात दोन जुन्या पुलांमुळे शहरातील रहिवासी त्रस्त title=

नागपूर :  नागपुरात दोन जुन्या पुलांमुळे शहरातील रहिवासी त्रस्त झालेत. नागपूरमधून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर हा पूल आहे. कन्हान नदीवर 1874 साली इंग्रजांनी हा पूल बांधला.. या पूलाला 143 वर्ष पूर्ण झालीत.. पुलाच्या काही भागात भेगा पडल्यात.

मात्र आजही प्रशासनाचं या पूलाकडे दुर्लक्ष आहे. अशीच अवस्था अजनी भागातील पुलाची.. जिर्ण झालेल्या या पुलावरुन जड वाहनांना जाण्याची  परवानगी नाही. या पुलाला पर्यायी मार्ग बनवण्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं याच पुलावरुन वाहतूक सुरु आहे. आता या दोन्ही पुलाचं काम वेळेत पुर्ण होणार की सरकारी यंत्रणा पुन्हा एखाद्या दुर्घटनेची वाट पहाणार असा सवाल इथले नागरिक विचारत आहेत.