कायद्याचा धाक उरला की नाही? बोनेटवरून ट्रॅफिक पोलिसाला फरफटत नेलं, व्हिडीओ

कायद्याचे रक्षकच सुरक्षित नाहीत! बोनेटवरून फरफटत नेलं

Updated: Dec 19, 2021, 01:40 PM IST
कायद्याचा धाक उरला की नाही? बोनेटवरून ट्रॅफिक पोलिसाला फरफटत नेलं, व्हिडीओ title=

नागपूर : अनेकदा पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं तर वाहतूक पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याचा घटना यापूर्वी देखील समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा नागपुरात अशीच भीषण घटना घडली आहे. कारच्या बोनेटवरून वाहतूक पोलिसाला फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

कारच्या बोनेनेटवर वाहतूक पोलिसाला कारचालक जबरदस्तीने घेऊन जात असल्याचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागपुरातील रामदास पेठ परिसरातील कॅनाल मार्गावरील हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहे. 

कार चालकाला वाहतूक पोलिसाने थांबवण्याचा प्रयत्न करत असताना कार चालकाने कार थांबवली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी चालकानं थेट वाहतूक पोलिसाला बोनेटवर घेत कार तशीच पळवली.

या कार चालकाचा सध्या शोध सुरू असून त्याच्य़ावर कारवाई कधी होणार याकडे आता लक्ष आहे. अशा प्रकारच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. त्यामुळे कायद्याचा धाक उरला आहे की नाही असाही प्रश्न सतावत आहे.