खमंग ब्राऊन तर्री पोहे; नागपूरच्या पोरांची कमाल

nagpur news: आपण नाश्त्याला पोहे आवर्जून खातो. ते आपल्याला कधीही कुठेही खायला आवडतात. त्यामुळे पोह्यांमध्ये विविध तयार केलेले पदार्थही आपण आवडीनं खाऊ शकतो. सध्या असाच एक खमंग प्रकार तुमच्या भेटीला आला आहे. 

Updated: Nov 27, 2022, 06:29 PM IST
खमंग ब्राऊन तर्री पोहे; नागपूरच्या पोरांची कमाल  title=
nagpur pohe

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: आपण नाश्त्याला पोहे आवर्जून (poha) खातो. ते आपल्याला कधीही कुठेही खायला आवडतात. त्यामुळे पोह्यांमध्ये विविध तयार केलेले पदार्थही आपण आवडीनं खाऊ शकतो. सध्या असाच एक खमंग प्रकार तुमच्या भेटीला आला आहे. तुम्हााल पांढरे पोहे (white poha) माहिती असतीलच पण तुम्ही कधी गव्हाच्या रंगाचे पोहे कधी पाहिले आहेत का? गव्हाच्या रंगांचे हे ब्राऊन पोहे (brown poha) तर्री पोह्यांप्रमाणे तयार करण्यात आले आहेत. ज्याची चव अनेक लोकांना रूचली आहे. हा प्रकार नागपूर (nagpur) येथील आहे. नागपूरात तर्री पोहे सगळ्यात फेमस आहेत. शहरातील प्रत्यके चौकात, टपरीवर हे तर्री पोहे विकले जातात. आणि ग्राहक ते आवडीने खातात. तुम्हीही हे पोहे कधीतरी खाल्ले असतील. पण तुम्ही ब्राऊन पोहे कधी खाल्ले आहेत का आणि तेही तर्री पोहे. सध्या अशाच नव्या ट्रेण्डच्या पोह्यांची चलती आहे. (nagpur news two young engineers makes brown tarri pohas running a startup)

नागपूरातील दोन मित्र यांनी एकत्र येऊन हा नवा व्यवसाय (startup) सुरू केला आहे ज्यात त्यांना ब्राऊन रंगांच्या पोह्याचं तर्री पोहे बनवले आहेत. हे दोघंही जण व्यवसायानं इंजिनिअर आहेत. त्यांनी पोहेवाला डॉट कॉम हे नवीन रेस्टोरंट सुरू केलं आहे. या नव्या हॉटेलमध्ये तुम्हाला पाच प्रकारचे पोहे मिळतील. हे ब्राऊन पोहे अगदी ऑरगॅनिक आहेत आणि तुमच्यासाठी अगदी हेल्थी आहेत. चाहूल आणि पवन असे या दोन इंजिनियर (engineer) तरूणांचे नावं आहे. आय लव्ह पोहा असं या दोघांच्या स्टार्टअपचं ब्रीदवाक्य आहे. 

हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

इंजिनियर मित्रांनी सुरू केला व्यवसाय 

चाहूल बालपांडे आणि पवन वाडीभस्मे हे खरतर इंजीनियरिंगचे मित्र आहे. पार्किंगवाला नावाच्या एका स्टार्टअप कार कंपनीमध्ये काम करताना आर्थिक चणचण भागवण्यासाठी पोहे विक्रीचं काम 2018 मध्ये रात्र पाळीत काम करणाऱ्यांना गरमा गरम पोहे देण्याच्या छोटश्या 10 बाय 10 खोलीतील काम विस्तारल आहे. नागपुर शहरात तीन दुकानं त्यांनी सुरू केलं. ते आता त्यांच्या आता चंद्रपूर, इंदोर, झारखंडसह इतर ठिकाणी फ्रांचायजी सुरू करण्याच्या तयारीत आहेत. 

एरवी टपरी किंवा दुकानात तुम्हाला नियमित मिळणारा पोहा खालला असेल. पण या याठिकाणी पाच प्रकारचे पोहे मिळतात. ज्यामध्ये तर्री पोहा, इंदोरी पोहा, पनीर पोहा, चिवडा पोहा, मिसळ पोहा मिळतो. सोबतच हेल्थ कॉनशियस असला तर खास ऑरगॅनिक ब्राऊन पोहा सुद्धा इथे खायला मिळतो. ज्यामध्ये तेल अगदी कमी लागत असून चव मात्र उत्तम आहे. यातच लोकमान्य नगर परिसरातील (lokmanya tilak nagar) पोहेवाला 24 तास उपलब्ध असल्याने फक्त ठराविक वेळी नाही तर 24 तास गरमागरम पोहे तुम्हाला एका फोन कॉल (phone call)  उपलब्ध होत आहे. रात्री जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अधिक पसंतीस ठरत असल्याचे ते सांगतात. 

हेही वाचा - Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

इंजिनियरींग सोडून नवा मार्ग निवडताना 

इंजिनियर म्हटल कीं बेरोजगार (unemployed) असे अनेक चिटकूले शोषक मीडियावर पाहायला मिळतात. पण नौकरी नाही म्हणून रडत न बसता आर्थिक चणचणीतुन एका स्टार्टअप मधून पोहेवाला डॉट कॉम सुरू झाला. पण आता हा पोहेवालाच मुख्य रोजगार झाला. गमतीशीर म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर तर दुसरा मेकॅनिकल असताना खवय्येगिरी जुगाड करून ऑरगॅनिक (organic brown poha) ब्राऊन पोहे त्यांनी सर्व्ह केले म्हणून इंजिनिअर इथेही जुगाडू ठरले हे विशेष.