'गोपीनाथ मुंडे असते तर धनगर आरक्षण मिळाले असते'

विधानपरिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेसह विरोधकांनी रणकंदन केलं

Updated: Jul 18, 2018, 06:21 PM IST
'गोपीनाथ मुंडे असते तर धनगर आरक्षण मिळाले असते' title=

नागपूर : विधानपरिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेसह विरोधकांनी रणकंदन केलं. गोपीनाथ मुंडे असते तर धनगर समाजाला आरक्षण मिळालं असतं असं सांगत शिवसेनेनं भाजपला डिवचलं. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं. या प्रश्नावर अल्पकालीन चर्चा विधानपरिषदमध्ये होती.

या आरक्षणाला आदीवासी विकास मंत्री यांचा नकार आहे, तेव्हा मुख्यमंत्री यांनीच उत्तर द्यावे अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्याने अखेर या प्रश्नाचे उत्तर राखून ठेवण्यात आलं. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. मात्र ही मागणी फेटाळून लावल्यामुळे विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं.