नागपुरात शेतकऱ्यांच्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

बिबट्याने केलेल्या हल्ल्यापासून बचावासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे.

Updated: Jan 14, 2018, 05:01 PM IST
नागपुरात शेतकऱ्यांच्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू title=

नागपूर : बिबट्याने केलेल्या हल्ल्यापासून बचावासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे.

नागपूरच्या उमरेड तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेत दोन शेतकरी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

उमरेड तालुक्यातील लोहारा गावातील शेतकरी राजेंद्र आणि रवींद्र ठाकरे हे शेतात गेले होते. शेतात गेल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं रवींद्र ठाकरे यांच्यावर हल्ला केला. 

रवींद्र यांना वाचवण्यासाठी आलेल्या राजेंद्र ठाकरे यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला. बिबट्यापासून बचावासाठी राजेंद्र ठाकरे यांनी कुऱ्हाडीने बिबट्यावर हल्ला केला. या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस आणि वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाकरे बंधूंना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

नागपुरात शेतकऱ्यांच्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू