तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण' VIDEO व्हायरल

तरुणींच्या दोन गटातील हाणामारीचा VIDEO सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

Updated: Apr 12, 2022, 04:21 PM IST
तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण'   VIDEO व्हायरल title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : तरुणींच्या दोन गटात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नागपूरच्य सिविल लाइन्स परिसरात असलेल्य हिस्लॉप कॉलेज जवळची ही घटना आहे. 

नेमकी घटना काय?
कॉलेज जवळच्या रस्त्यावर दुपारच्या वेळेस सहा-सात तरुणी उभ्या असताना अचानक त्यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली. आधी या तरुणींमध्ये वाद झाला आणि त्यानतंर वादाचं रुपांतर फ्रीस्टाईल हाणामारीत झालं. या तरुणी एकमेकांच्या विरोधात हातघाईवर उतरल्या आणि एकमेकांचे केस ओढत रस्त्यावर हाणामारी करू लागल्या. 

रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडिओ शूट केला असून सध्या व्हायरल व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. सीताबर्डी पोलिस स्टेशन अंतर्गत घडलेल्या या घटनेसंदर्भात पोलीस माहिती घेत असून कोणीही तरुणीने तक्रार करायला न आल्यामुळे पोलिसांनी स्वतःहून भांडण करणाऱ्या तरुणी कोण आहेत ते कोणत्या कारणा वरून एकमेकांशी भांडत होत्या याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.