लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यानेच लाच मागितली...आणि

सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं लाच मागितली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीकडे तक्रार करता येते. 

Updated: Dec 26, 2019, 12:45 PM IST
लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यानेच लाच मागितली...आणि title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं लाच मागितली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीकडे तक्रार करता येते. मात्र एसीबी निरीक्षकानंच लाच मागण्याचं प्रकरण नागपुरात उघड झालं आहे. 

सीटी सर्व्हेतील सर्वेअर आश्रय जोशी याला एक लाख रुपयांच्या लाचप्रकरणी एसीबी पोलीस निरीक्षक पंकज उकंडे यानं काही दिवसांपूर्वी अटक केली. 

या प्रकरणात सीटी सर्व्हेतील एका महिला कर्मचा-याला सहआरोपी न करण्यासाठी उकंडेनं या महिलेकडे २ लाख रुपये, तसंच वाढीव एसीबी कोठडी न देण्यासाठी आश्रय जोशीकडे ५० हजारांची मागणी केली. 

पंकज उकंडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उकंडे फरार झाला आहे. कुंपणच शेत खात असल्याच्या या धक्कादायक प्रकरणातल्या दोषीवर कडक कारवाईची मागणी होत आहे.