खंडणीचा गुन्हा, आपल्यावर खोटे आरोप - नगरसेवक गायकवाड

केडीएमसीमधील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: Dec 26, 2019, 12:32 PM IST
खंडणीचा गुन्हा, आपल्यावर खोटे आरोप - नगरसेवक गायकवाड title=
संग्रहित छाया

कल्याण : केडीएमसीमधील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी कंत्राटदाराकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण पूर्वेत शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या प्रकरणानंतर सेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहेत. आपल्याला खोट्या गुन्हात अडकविण्यात आले आहे, असा पलटवार महेश गायकवाड यांनी केला आहे.

नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. महेश गायकवाड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढेच नाही तर महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर खोट्या गुन्हात अडकवण्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आमदारांनीही आरोप केला आहे. 

कल्याण पूर्वमध्ये महेश गायकवाड यांच्या प्रभागात एका खासगी कंपनीकडून खोदकाम करून केबल टाकण्याचे काम सुरु आहे. काम सुरु असताना महेश गायकवाड यांचे समर्थक पोहोचले आणि खोदकाम करणाऱ्या कामगारांना मारहाण केली, असा कंत्राटदाराचा आरोप आहे. तसेच महेश गायकवाड यांनी त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी मागितली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महेश गायकवाड यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हे आरोप फेटाळले असून गुन्हेगार काहीपण आरोप करतो, खोदकाम करण्यासाठी संबंधित कंपनी महापालिकेला पैसे भरते खंडणी मागणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.