हिवाळी अधिवेशन - शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

  नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन आलोय. मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली असे लिहून द्यावं, असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यानी दिलं.

Updated: Dec 11, 2017, 08:48 PM IST
हिवाळी अधिवेशन - शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक   title=

नागपूर  :  नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन आलोय. मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली असे लिहून द्यावं, असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यानी दिलं.

मुख्यमंत्र्यांंचे आक्रमक उत्तर 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनीही तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिलंय. आघाडीच्या कर्जमाफीत जितके पैसे विदर्भाला मिळाले, तितके एकट्या बुलडाणा जिल्ह्याला दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. शिवाय आघाडीची कर्जमाफी फसवी होती. आणि शेतक-यांच्या आत्महत्या हे काँग्रेस सरकारचं पाप असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.