शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, नाफेडनं कांदा खरेदी करणं सोडून लावला अटी, शर्थींचा बॅनर

NAFED Banner: केवळ दर्जेदार कांदाच खरेदी केला जाणार असल्याचा उल्लेख या बॅनरवरील अटींमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी केवळ गाजर ठरण्याची  शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी न करता केवळ बॅनर लावून शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 25, 2023, 05:10 PM IST
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, नाफेडनं कांदा खरेदी करणं सोडून लावला अटी, शर्थींचा बॅनर title=

NAFED Banner: नाफेडनं कांदा खरेदी करणं सोडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय. नाशिक जिल्हात नाफेडनं कांदा खरेदी करण्याबाबतच्या अटी आणि शर्तींचं बॅनरच लावलंय. यात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. केवळ दर्जेदार कांदाच खरेदी केला जाणार असल्याचा उल्लेख या बॅनरवरील अटींमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी केवळ गाजर ठरण्याची  शक्यता आहे. 

नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी न करता केवळ बॅनर लावून शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करताना त्यात अटी शर्ती ठळकपणे समोर मांडल्या आहेत. त्यामुळे कुठलाही शेतकरी आपला कांदा घेऊन केंद्रावर विक्री करण्यास जाणार नाही.

अटी शर्ती पुढीलप्रमाणे 

प्रति हेक्टर 280 क्विंटल पेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही.
दर्जेदार 45 मिमीच्या पुढचा चांगला कांदा चालेल.

पुढील गुणवत्ता असलेला कांदा स्वीकारला जाणार नाही 
विळा लागलेला, पत्ती लागलेला, काजळी असलेला, रंग गेलेला, उन्हामुळे चट्टे पडलेला, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, गरम मऊ असलेला, बुरशीजन्य, वास येत असलेला, मुक्त बेले असलेला

Success Story: वडील वेचायचे भंगार, मुलाला गुगलकडून मिळाले 1 कोटींचे पॅकेज

'स्वाभिमानी'चे 'रास्ता रोको'

कांदा प्रश्नावरून नाशिकच्या देवळा बाजार समितीत शेतकरी आक्रमक झालेत. शेतक-यांनी प्रहार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच रास्ता रोको आंदोलन केलं. जिल्ह्याधिका-यांनी नाफेडच्या दराप्रमाणे कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले असताना देवळा बाजार समितीत नाफेडचा एकही अधिकारी  फिरकला नाही. त्यामुळे शेतक-यांचा संताप अनावर झाला.

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

कांद्याचे भाव पंधराशे रुपयांवर आल्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी नाराज आहे. नाफेडने अद्याप खरेदी सुरू केलेली नाही तर दुसऱ्या बाजूला भाव कमी होत असल्याने देवळा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आज पुन्हा लिलाव बंद पाडले.  नाफेडने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून देवळा बाजारसमिती शेतकऱ्यांनी बंद पाडली.