Nupur Sharma Controversy : मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुपूर शर्मा विरोधात संताप

नुपूर शर्मा (Nupur Sharma Controversy) यांनी मुस्लीम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. 

Updated: Jun 10, 2022, 04:37 PM IST
Nupur Sharma Controversy : मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुपूर शर्मा विरोधात संताप title=

औरंगाबाद : नुपूर शर्मा (Nupur Sharma Controversy) यांनी मुस्लीम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नुपूर शर्मा विरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे. नुपूर शर्माच्या वक्तव्याबाबत औरंगाबाद, परभणी अशा विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शन केली जात आहेत. (muslim community aggresive in various district in marathwada over to bjp nupur sharma controvesy statment about mohammad paigambar) 

मुस्लिमांकडून परभणी बंदची हाक

परभणीत मुस्लिम समाज आक्रमक झाले आहेत. मुस्लिमांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नुपूर शर्माला अटक करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सोलापूर पाठोपाठ औरंगाबादेतही तीव्र पडसाद 

सोलापूर पाठोपाठ औरंगाबादेतही तीव्र पडसाद उमटले आहेत. नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात औरंगाबादमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी निदर्शने केली. विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमले.

नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून परभणीत मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. मुस्लिम बांधवांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नुपूर शर्माला अटक करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.