यवतमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा

आश्रमशाळेतील पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा झालाय. काही दिवसापूर्वीच प्रदीप शेळकेची हत्या करण्यात आली होती. 

Updated: Nov 18, 2017, 01:39 PM IST
यवतमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा  title=

यवतमाळ : आश्रमशाळेतील पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा झालाय. काही दिवसापूर्वीच प्रदीप शेळकेची हत्या करण्यात आली होती. 

प्रदीपचा मारेकरी हा आठवीतला विद्यार्थी असल्याचे समोर आलं आहे. हा मुलगा ढाणकी येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी आहे. त्याने चिडविण्याच्या रागातून ही हत्या केल्याचा प्राथमिक तपासात समोर आलं आहे. 

प्रदीपचा आरोपीने फरशीने ठेचून व करदोड्याने गळा आवळून केला खून केला होता. मारेकरी विद्यार्थ्याने दुस-यावर संशय यावा म्हणून अन्य विद्यार्थ्यांचा फोटो चिटकविलेल्या चिठ्ठीत मी खून केला आहे, असे लिहिले होते. पोलिसांच्या तपासात याच चिठ्ठीमुळे प्रदीप शेळकेच्या खूनाचा उलगडा झाला.