वर्ध्याच्या म्हाडा कॉलनीत २ तरुणांवर खूनी हल्ला

वर्ध्यामधल्या म्हाडा कॉलनी चौकात सकाळी साडे नऊच्या सुमाराला ४ ते ५ तरुणांनी २ तरुणांवर खूनी हल्ला केला.

Updated: Dec 15, 2017, 04:35 PM IST
वर्ध्याच्या म्हाडा कॉलनीत २ तरुणांवर खूनी हल्ला  title=

वर्धा : वर्ध्यामधल्या म्हाडा कॉलनी चौकात सकाळी साडे नऊच्या सुमाराला ४ ते ५ तरुणांनी २ तरुणांवर खूनी हल्ला केला.

हल्ल्यात एकाचा मृत्यू

या जीवघेण्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. समीर मेटागडे असं मृत तरुणाचं नाव असून समीर श्रीवास हा जखमी झाला आहे. विपुल गुप्ता नावाच्या तरुणानं त्याच्या ४ - ५ साथीदारांच्या सोबतीनं हा हल्ला केला. 

प्रेम प्रकरणाचा वाद

प्रेम प्रकरणाच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचं बोललं जातंय. पोलीस मारेक-यांच्या शोधत आहेत. या घटनेमुळे वर्ध्यात खलबल उडाली आहे.