दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमुळे खडाजंगी उडाली आहे. ठाणे मेट्रोच्या प्रश्नावरून शिवसेना आमदार प्रताप नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
कासारवडवली ते ठाणे मेट्रोची घोषणा अनेक महिन्यांपासून झाली आहे. मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नसल्याने शिवसेना संतापली आहे. कासारवडवली ते ठाणे मेट्रोचे काम अद्याप सुरू न झाल्याने विधानसभेत नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वर्षापूर्वी बीकेसी येथे या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. भूमीपूजन होऊन एक वर्ष उलटले तरी मेट्रोच्या कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे शिवसेना या मुद्द्यावरून आक्रामक झाली आहे.
या मेट्रो मार्गासाठी शिवसेनेने अनेक वेळा आंदोलन केले. मोठ्या संघर्षानंतर आणि प्रतिक्षेनंतर या मेट्रो मार्गाच्या भूमिपूजन झाले, पण काम कधी सुरू होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. तर लवकरात लवकर या मार्गाचे काम सुरू करावे, अशी प्रताप सरनाईक यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत मागणी केली.