कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कल्याणमध्ये आई समोरच 12 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. 25 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून या 12 वर्षाच्या मुलीची हत्या केली. 

Updated: Aug 23, 2023, 11:17 PM IST
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल title=

Kalyan Crime News : एतर्फी प्रेमातून 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली होती.  कल्याणमधील या अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी पोलिसांविरोधात आंदोलन करून पोलिसांवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाल आहे. 

20 ऑगस्टला कोळशेवाडी पोलीस ठाण्यावर काढला होता निषेध मोर्चा

अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या घटनेनंतर २० तारखेला कोळशेवाडी पोलीस ठाण्यावर काढण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान ठाकरे गटाचे युवा सेना शहरप्रमुख नीरज कुमार याने पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांविरोधात भाषण करत पोलिसांवर टीका केली होती. पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांविरोधात भाषण करणाऱ्या ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख नीरज कुमार यांच्या विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अप्रतीची भावना चेतवणे प्रकरणी 1922 कलम ३ अन्वये  नीरज विरोधात तसेच विना परवानगी मोर्चा काढल्या प्रकरणी नीरज कुमार सह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या कार्यक्षमेतवर गंभीर आरोप

कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीची हत्या एका तरुणाने केली. या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर २० ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात पोहचला असता त्याठिकाणी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यानी ठिय्या मांडला. यावेळीठाकरे गटाचे युवा सेना शहर प्रमुख नीरज कुमार यांनी भाषण केले. हे भाषण पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे होते. कल्याण पूर्वेत नशेखोर खुले आम फिरतात. तसेच नागरीकांवर शस्त्रांनी हल्ले होता. मुलीची तिच्या आई समोर मुलीची चाकूने हत्या केली जाते. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न होतो. आम्ही करदाते नागरीक आहोत. आमची सुरक्षा करणे पोलीसांचे कर्तव्य आहे. त्या बदल्यात पोलिसांना पगार मिळतो. पोलिसांना किती हप्ता पाहिजे. पगार पुरत नसेल तर आम्ही लोकवर्गणी काढून पैसे देऊ असे भाषण नीरज कुमार यांनी केले हाेते. नीरज कुमार यांच्या भाषणाची व्हीडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्याची दखल घेत पोलिसांच्या विरोधात भाषण केल्या प्रकरणी नीरज कुमारसह अनेक जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.