ठाणे : मुंब्रा बायपास रस्ता येत्या मंगळवारपासून तब्बल दोन महिन्यार्पयत बंद राहणार आहे. त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर पनेवल सार्वजनिक बांधकाम विभागाने मुहूर्त काढल्यानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. याचा परिणाम ठाणो आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर होण्याची शक्यता असल्याने जेएनपीटी येथून निघणाऱ्या एक टक्के वाहतुकीपैंकी आठ टक्के वाहतूक तेथेच थांबवली जाणार आहे. केवळ दोन टक्के वाहतूक या कालावधीत सोडली जाणार आहे. तसेच दुरूस्ती कामामुळे वाहतूक मार्गात केलेल्या बदलांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ होऊ नये, यासाठी माहिती पत्रके आणि टोकनचे वाटप जेएनपीटीकडून वाहन चालकांना केले जाणार असून यामध्ये वाहतुकीचा मार्ग, वाहतुकीची वेळ अशी माहिती असणार आहे. दरम्यान, टोकनवर दिलेल्या वेळेचे पालन न करण्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणो वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंब्रा बायपास संदर्भात आता वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सर्व पर्यायी मार्गाचा अभ्यास केला असून आता येत्या 24 एप्रिलपासून या कामाला सुरु वात होणार आहे. तब्बल दोन महिने हे काम सुरू राहणार असून त्यासाठी मुंब्रा बायपास पूर्णत: वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्याच्या दुरुस्तीमध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे बांधकाम, बेअरिंग मजबूत करणो आणि बदलणे, काही डेस्कलॅब तोडून नवीन बांधणो ही कामे केली जाणार आहेत.
हा रास्ता मुख्यत: जेएनपीटी कडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो. सोबत ठाणो,कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठी देखील चार चाकी आणि दुचाकी वाहन चालक याचा वापर करतात. या सर्वांना दोन महिने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गावरून ही वाहने वळवली आहेत. मुंब्रा वाय जंक्शन ते रेतीबंदर असे सात किलो मीटर रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. केवळ लहान वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश दिला जाणार असून मुंब्रा बायपासवर केवळ बायपासच्या कामाच्या संदर्भातील गाड्यांना सोडले जाणार आहे, त्यांना विशेष मार्किग केले जाणार आहे याशिवाय जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांना शहरातून सोडले जाणार आहे . ठाणो आणि नवी मुंबईचा वाहतुकीचा भार कसा कमी होईल, यादृष्टीने विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे उपायुक्त काळे यांनी सांगितले .
मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक दोन टोल भरण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे स्पष्ट करून वाहन चालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यापैंकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा, अशा सूचना दिल्याची अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंब्रा बायपासच्या कामाला दोन महिन्याचा कालावधी लागणार असून ते पूर्ण करण्यासाठी 24 तास काम करण्यात येणार आहे. यामध्ये डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे आणि बेअरिंगचे काम करण्यात येणार आहे पावसापूर्वी हे काम संपवावे, अशा सूचना पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.