मुंबईतील तरुणाचा धबधब्यात पडून मृत्यू

मुंबईतून येथे  पर्यटनासाठी आलेला एका तरुणाचा टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात पडून मृत्यू झाला. धवल परमार असं या तरुणाचं नाव आहे. 

Updated: Jul 20, 2017, 07:40 PM IST
 title=

लोणावळा : मुंबईतून येथे  पर्यटनासाठी आलेला एका तरुणाचा टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात पडून मृत्यू झाला. धवल परमार असं या तरुणाचं नाव आहे. 

अंधेरी, मुंबईमधून धवल हा आपल्या मित्र मैत्रिणी सोबत लोणावळ्यात आला होता. हे सर्व सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भुशी डॅमच्या पुढे असलेल्या टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात मौजमस्ती करण्यासाठी उतरले होते.

 यावेळी धबधब्याखाली असणाऱ्या पाण्याने भरलेल्या सुमारे १५ ते २० फूट खोल खड्ड्यात धवल पडला. दुपारी १२ वाजता धवल याचा मृतदेह बाहेर काढण्यात लोणावळा पोलीस आणि स्थानिक तरुणांना यश मिळाले.