Traffic Rules : तुम्ही कार, बाइक चालवता? मग 'हा' नियम वाचा, अन्यथा...!

Traffic Rules : जर तुम्ही कार किंवा बाईक बेदरकारपणे चालवत असाल तर आधी वाहतूक विभागाचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या..

Updated: Feb 19, 2023, 10:40 AM IST
Traffic Rules : तुम्ही कार, बाइक चालवता? मग 'हा' नियम वाचा, अन्यथा...!  title=
Mumbai Traffic Fines: Traffic Challan Rates & RTO Fines

Traffic Rules : आपल्या देशात रस्ते अपघात (Road Accidents) आणि त्यात जाणारे बळी यांचे प्रमाण प्रचंड आहे. रस्ते अपघातांमागे मुख्य कारण असते ते बेदरकारपणे नियम न पाळता वाहन चालवणे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही (Mumbai) रस्ते अपघातांचे आणि वाहतूक कोंडीचे (Traffic Jam) प्रमाण वाढत असल्यानं वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

वाहतूक खात्याने जानेवारी 2023 या एकाच महिन्यात 41 हजार 587 वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 50 लाख 67 हजारांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण मोठे असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 206.96 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2023 च्या मध्यापर्यंत तब्बल 38 कोटी 17 लाख 9 हजार 200 ऊपयांची रक्कम दंडाच्या स्वऊपात वाहतूक पोलीस खात्याकडे आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता मुंबईत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा करण्यात येणार असून, चुकीच्या किंवा विरुद्ध बाजूने (Wrong Side Driving) गाडी चालवल्यास एफआयआर (FIR) म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

वाचा: शिवाजी महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कधी आणि कशी मिळाली? 

बेशिस्तीमुळे अपघातांची मालिका सुरूच

नव्या वर्षाची सुरूवात ही अपघाताच्या मालिकेनेच सुरू झाली. बेशिस्त वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून विना हेल्मेट गाडी चालविल्यामुळे बहुतेकजणांना जीवास मुकावे लागले आहे. तर ‘ओव्हर टेक’ करण्याचे प्रकार वाढले असून कोणत्याही बाजूने ओव्हर टेक करण्यात येत असल्याने अपघात घडतात. बहुतांश अपघात अतिवेगामुळे होतात. वाहतूक पोलिसांकडून नियमांबाबत जनजागृती करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच राज्यात अपघात वाढत आहे आणि ही राज्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. म्हणूनच वाहतूक विभागाकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. सुरूवातीला वाहतूकीचे नियम मोडल्यास वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र आता वाहतूकीचे नियम मोडल्यास आता थेट कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.