Mumbai Job: शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Mumbai Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 22, 2023, 01:55 PM IST
Mumbai Job: शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी title=

Mumbai Sci Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे 'इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी' पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे शिप बोर्ड ट्रेनिंगचा किमान 8 महिन्यांचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेकडून मागण्यात आलेल्या कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून 1 वर्ष काम केल्याचा अनुभव असावा. 

1 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारानी आपले अर्ज fleet.appraisal@sci.co.in यावर पाठवायचे आहेत. उमेदवाराच्या अनुभवानुसार ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. 

30 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पालिकेत नोकरीची संधी 

दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी दहावी ते पदवीधर अशा सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पदभरती अंतर्गत एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात ज्युनिअर लायब्रेरियनचे 1, ज्युनिअर डायटेशियनच्या 3, ऑप्टोमेट्रिस्टचे 1 आणि ऑडिओलॉजिस्टची 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी मिळू शकणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज खोली क्र. 15, तळ मजला, रोख विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, कॉलेज बिल्डिंग येथे पाठवायचे आहेत. 

14 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर, चुकीच्या पद्धतीने पाठवलेले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या 

 मुंबई येथे रिक्त जागांच्या भरतीसाठी (SCI Mumbai Bharti 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 30 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर2023 आहे.