मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटे दरड कोसळली.  

Updated: Jul 7, 2019, 09:40 AM IST
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली title=

रायगड : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटे दरड कोसळली. बोरघाटात पहाटेच्या सुमारास दरड कोसळलीय. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ही दरड कोसळलीय. दरड कोसळल्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. 

दरम्यान, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार आणि ट्रकची टक्कर झाली. या अपघातात तीन ठार आणि १ जण गंभीर जखमी झालाय. सकाळी सहाच्या सुमाराला ही टक्कर झालीय. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. 

पावसामुळे समोरचं काहीच दिसत नसल्याने स्विफ्ट कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. यात स्विफ्ट कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृतांची ओळखप पटलेली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.