Mumbai Air Quality: मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे

Mumbai Weather : मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणे आणि मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या दोन्ही शहरात श्वास घेणे कठीण झालं आहे.   

Updated: Jan 9, 2023, 12:27 PM IST
Mumbai Air Quality: मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे title=
mumbai pune Air Quality very dangerous weather update next two days Important marathi news

Mumbai Air Quality : गेल्या काही दिवसांपासून देशासह (Winter Cold Wave) राज्यातील तापमानात जोरदार बदल झाला आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच थंडीने जोर धरला आहे. उत्तरेकडे तर थंडीने कहर केला आहे. अशातच मुंबई (Mumbai) आणि पुणेकरांची (Pune) मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या दोन्ही शहरातील लोकांना श्वास घेणं कठीण झालं आहे. कारण सध्या मुंबई आणि पुण्यात सर्वत्र धुरकट वातावरण जाणवतंय. मुंबई आणि पुण्याची हवा (Mumbai Pune Air Quality) अत्यंत खराब झालीय. त्यामुळे मुंबईकर आणि पुणेकरांनो मोकळ्या हवेत श्वास घेत असाल तर सावधान...

पुढील दोन दिवस धोक्याचे!

मुंबई (Dangerous air in mumbai) आणि पुणे शहरातील हवेत प्रदूषणकारी धूलिकणांचं प्रमाण वाढलंय. थंडीमुळे हवेच्या प्रदूषणात आणखीनच भर पडतीये.. धूर आणि धुक्याच्या मिश्रणानं हवा दूषित झालीये.. पुढील दोन दिवस पुण्याची हवा धोकादायक तर मुंबईची हवा अतिधोकादायक असेल असा अंदाज सफर या संस्थेनं वर्तवलाय. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेअंतर्गत 'सफर'कडून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि हवेच्या गुणवत्तेचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. (mumbai pune Air Quality very dangerous weather update next two days Important marathi news)

या परिसरातील लोकांनी विशेष काळजी घ्या!

मुंबईतील हे परिसर धोकादायक

  • कुलाबा
  • माझगाव
  • अंधेरी
  • चेंबुर
  • मालाड
  • नवी मुंबई 
  • भांडुप 

पुण्यातील हे परिसर धोकादायक

  • शिवाजीनगर
  • हडपसर
  • कोथरूड

हवा खराब, तब्येत सांभाळा!

घसरलेला पारा, थंडी तसंच धुकं अशा बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना घशाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमालीचं वाढलंय. रूग्णांना घसा खवखवणे, घशात तीव्र वेदना या तक्रारी पहिल्या टप्प्यात जाणवत आहेत. घसा दुखू लागला की कान दुखण्याच्या तक्रारीही आहेत. अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याचं आवाहन करण्यात आलंय. सरकारी आणि खासगी दवाखान्यात सध्या घसादुखी, ताप, सर्दीच्या रूग्णांच्या रांगा लागल्या आहेत. घसा दुखण्याच्या आणि नाक चोंदण्याची तक्रार एकाच वेळी दिसून येत आहे. 

ही लक्षणं जाणवतील 

अस्थमाच्या रुग्णांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे या रुग्णांनी विशेष काळजी घ्या. त्याशिवाय खालील लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा. 

  • श्वसनास त्रास
  • खोकला
  • घशात वेदना
  • थकवा 
  • डोकेदुखी