electricity bill hike in maharashtra : आता बातमी आहे सर्वसामान्यांच्या बजेटची...नवीन वर्ष सर्वसामान्यांसाठी वीजेचा झटका घेऊन आला आहे. कारण राज्यातल्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सरासरी 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली आहे. तिन्ही वीज कंपन्यांची दरवाढ मान्य झाल्यास वीज पुरवठ्याचा सरासरी दर अकरा रुपये प्रति युनिटवर जाण्याची भीती असून ही दरवाढ सुमारे 51 टक्के असेल. या प्रचंड दरवाढीने जनतेचा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दरवाढ होऊ नये यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागणार आहे. (Breaking news electricity bill hike in maharashtra 2 rupees 35 paise per unit increase State power consumers face tariff hike marathi news)