Mumbai North Central Lok Sabha Result 2024 : मुंबईतील हाय व्होल्टेज लढत! वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम

मुंबई उत्तर मध्य लोकसभा निकाल 2024: वर्षा गायकवाड यांच्यासमोर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचं आव्हान असलयाने उत्तर मध्य मुंबईची जागा चांगलीच चर्चेत आली. 

वनिता कांबळे | Updated: Jun 4, 2024, 02:39 PM IST
Mumbai North Central Lok Sabha Result 2024 : मुंबईतील हाय व्होल्टेज लढत! वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम title=

Mumbai North Central  Lok Sabha Result 2024 in Marathi:  उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात भाजपचे उज्ज्वल निकम विरुध्द काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत रंगली आहे. मुंबईतील ही सर्वात हाय व्होल्टेज लढत आहे. वर्षा गायकवाड--दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या  या मतदारसंघात दलित, मुस्लिम मते निर्णायक आहेत. येथे मतमोजणी सुरु आहे. उज्ज्वल निकम यांचं मार्जिन घटलं आहे. वर्षा गायकवाड  44651 हजार मतांनी आघाडीवर आहेत.  8964 मतांनी लीड घटली आहे. 

वर्षा गायकवाडांविरोधात नाराजीचा सूर

वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा  माजी मंत्री नसीम खान, माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी असे काँग्रेसचे बडे नेते गैरहजर होते. वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध असल्याची चर्चा रंगली होती. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुस्लिमबहुल आहे.. त्यामुळे इथून उमेदवारी मिळण्याची आशा नसीम खान यांना होती.. मात्र उमेदवारीची माळ वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात पडली.. त्यामुळे नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचाही राजीनामा दिला.. वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं नाही.. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरुन नसीम खान यांच्यासह माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप हेदेखील नाराज असल्याची चर्चा होती.  नसीम खान हे चांदिवलीचे माजी आमदार आहेत... माजी मंत्री असलेल्या नसीम खान यांचा मुस्लिम मतांवर मोठा प्रभाव आहे

भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्याआधी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते.. जोगेश्वरी पूर्वमधून विधानसभा लढलेल्या भाई जगतापांनी कामगार नेते आणि मराठी चेहरा म्हणून ओळख आहे..  चंद्रकात हंडोरे हे माजी मंत्री आहेत.. राज्यसभेचे विद्यमान खासदार असलेले चंद्रकांत हंडोरे यांची मुंबईतला मोठा दलित चेहरा म्हणून ओळख आहे.. सुरेश शेट्टी हे अंधेरी पूर्वचे माजी आमदार आहेत... माजी मंत्री असलेल्या सुरेश शेट्टींचा दक्षिण भारतीय मतांवर मोठा प्रभाव आहे.
तेव्हा उत्तर मध्य मुंबईत मोठा प्रभाव असलेले हे चारही नेते गैरहजर असल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.