Samruddhi Mahamarg Accident : अनिरुद्ध दवाळे / अमरावती : पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. (Accident News) अमरावतीजवळ झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. (Amravati Accident) धामणगाव तालुक्यात शेंदुरजनाजवळ भरधाव ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे दोन तुकडेच झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. (Mumbai Nagpur Samruddhi Highway Accident ) जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
समृध्दी महामार्गावर दिवसेंदिवस भीषण अपघात होत असून अपघाताची मालिका सुरु आहे. आज पुन्हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे समृध्दी महामार्गावरील पुलावरुन ट्रक थेट खाली कोसळला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा भरधाव वेगाने जाणारा ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात होता. मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसऱ्या एका अपघातात शिवभक्त जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे सकाळी चालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला भरधाव गाडीने उडविले आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः ट्रकचे दोन तुकडे झाले असून ट्रक वरील कानेटेंर हा खाली कोसळला असून ट्रकचा मूळ ढाचा हा पुलावर लटकून पडल्याचे पाहायला मिळाले आहे. या अपघाताने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
मावळमधील शिवभक्तांच्या टेम्पोला भीषण अपघात झालाय. या अपघातात 30 ते 35 शिवभक्त जखमी झालेत तर 10 गंभीर जखमी झालेत. बंगळुरू-मुंबई महामार्गावरील ताथवडे हद्दीत एक कंटेनरनं टेम्पोला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झालाय. मल्हारगडहून लोणावळामार्गे शिलाटणे इथं ही शिवज्योत घेऊन शिवभक्त निघाले होते. सर्व जखमींवर मावळमधील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी भागात मॉर्निंग वॉकला जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव गाडीने उडवले आहे. पाच तारखेला झालेला हा भीषण अपघात सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. तर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामागे घातपात तर नाही ना याचाही तपास पोलीस करत आहेत.