Mumbai Best Bus Accident : मुंबईत भीषण अपघात झाला आहे. कुर्ला एलबीएस रोडवर हा अपघात झाला आहे. बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली. या बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 3 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात 10 पेक्षा अधिक लोक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मोठा गोंधळ झाला असून तणाव स्थिती निर्माण झाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला आहे. 20 जण जखमी झाल्याची पालिकेची माहिती आहे. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ब्रेक फेल होऊन बस क्रमांक 332 थेट मार्केटमध्ये घुसली. यात काहींचा जागीच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे जात असताना, रात्री पाऊणे दहा वाजता ही दुर्घटना घडली. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कुर्ला अपघातावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दुख: व्यक्त केलंय. ही दुर्घटना धक्कादायक आणि चिंताजनक असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.