चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात

सध्या अनेक रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे तरुणाईच नाहीतर अबाल वृद्धांमध्ये नवे फॅड आलंय.

Updated: Nov 1, 2022, 06:34 PM IST
चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात title=
mumbai instagram reel star surendra patil in trouble as his video on police chair went viral on social media nz

अतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली  :  सध्या अनेक रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे तरुणाईच नाहीतर अबाल वृद्धांमध्ये नवे फॅड आलंय. मग या रिल्स बनवत स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी सद्या काहीही केलं जातंय. अनेक लोक या रिल्समुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. अशातच एका डोंबिवली मधील व्यावसायिकानं चक्क पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या खुर्चीवर बसून रिल्स बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतील सुरेंद्र पाटील हा बांधकाम व्यासायिक कामानिमित्त डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात आला होता, यावेळी त्याने पोलिसांच्या खुर्चीवर बसूनच रील्स बनवले. 

हे ही वाचा - इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस, तरुण आले जोशात अनं...पाहा हा VIDEO

प्रकरण काय होतं?

त्यानंतर या बहाद्दराणे बंदूक घेऊन मित्रांसोबत डान्स करताना व्हिडियो बनवत व्हायरल केला .अवघ्या काही तासात हा व्हिडिओ व्हायरल झाला . मग पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.डोंबिवली ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील याला एका तांत्रिक बाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत तब्बल ३० लाखाना गंडा घातला होता.. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत कथित तांत्रिक बाबासह साथीदारांना अटक करत सुमारे २० लाख रुपये रक्कम हस्तगत केली होती .ही रक्कम फिर्यादी सुरेंद्र पाटील याला परत करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी सुरेंद्र पाटील याला पोलीस ठाण्यात बोलवले होते.

हे ही वाचा - मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..

कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आले?

सुरेंद्र हा दिवाळीत मानपाडा पोलीस ठाण्यात गेला होता. संबधित पोलीस अधिकाऱ्याने सुरेंद्र याला केबिन मध्ये थांबवून वरिष्ठांची सही घेण्यासाठी ते बाहेर गेले . याचा फायदा घेत पाटील याने खुर्चीवर बसून स्वतः चे रिल बनविले. त्यानंतर त्याने हातात बंदूक घेऊन मित्रांसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल केला.अशाप्रकारे व्हिडिओ काढणे या बांधकाम व्यवसाय सुरेंद्र पाटील यांना चांगलाच महागात पडलंय. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सुरेंद्र पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला... सुरेंद्र पाटील सह इतर काही जणांना मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे .त्याची महागडी मरसडीज गाडी, कुकरी, पिस्तूल देखील जप्त करण्यात आली आहे.