पनवेलकरांना मुंबई गाठणे होणार सोप्पे, लवकरच सुरू होतेय मेट्रो, वाचा किती असेल तिकीट दर

Navi Mumbai Metro: गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रो आता नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. उद्यापासून मेट्रोचा प्रवास सुरू होत आहे. या मेट्रोमुळं पनवेलकरांना मुंबई गाठणे सोप्पे होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 16, 2023, 08:02 PM IST
पनवेलकरांना मुंबई गाठणे होणार सोप्पे, लवकरच सुरू होतेय मेट्रो, वाचा किती असेल तिकीट दर title=
Mumbai inaugurate the Navi Mumbai metro know the fair and route

Navi Mumbai Metro: तब्बल 12 वर्षानंतर नवी मुंबईकरांची मेट्रोची (Navi Mumbai Metro) प्रतीक्षा संपणार आहे. उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तात्काळ मेट्रो सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांचे गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला आहे. बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो 17 नोव्हेंबर 2023 पासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे.

 बेलापूर ते पेंढर पर्यंत 11 किमी पर्यंतचा मेट्रोचा पहिला टप्पा तयार आहे. या मार्गावरील मेट्रोचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये सीएमआयईएस प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र विविध कारणांमुळं सेवा सुरू होऊ शकली नव्हती. या दरम्यान सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्थानकात अपूर्ण राहिलेले कामदेखील पूर्ण झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुहूर्त ठरवण्यात येत होता. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र, आता उद्घाटनाशिवायचं मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमुळं ुपनवेलकरांना मुंबई गाठणे सोप्पे होणार आहे. 

21 जून रोजीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सिडकोला मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळं बेलापूर ते पेंढरपर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाऊ शकते. तशी तयारीही मेट्रोने सुरू केली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 3063 कोटींचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, 2019मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेट्रो प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला होता.

नवी मुंबई मेट्रो सेवा  17 नोव्हेंबर 2023 रोजी पेंढर (तळोजाजवळ) ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंढर दरम्यान दुपारी 3.00 वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री  10 वाजता असणार आहे. तर, दिनांक18 नोव्हेंबर 2023 पासून पेंढर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंढर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता 

नवी मुंबई मेट्रोची जबाबदारी महामेट्रोला सोपवण्यात आली आहे. मेट्रोकडून प्रवासीभाडेदेखील ठरवण्यात आले आहे. 2 किमीसाठी 10 रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडे असेल. त्यांनंतप प्रति 2 किलोमीटरसाठी 5 रुपये भाडे वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 10 किमीपासून पुढे 40 रुपये भाडे असेल. बेलापूर ते  पेंढरपर्यंतचे भाडे 40 रुपये असणार आहे. 

नवी मुंबई मेट्रो स्टेशनची नावे 

बेलापूर ते पेंढर (तळोजाजवळ) पर्यंत 11 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 2 स्टॉप आहेत. या मार्गावर बेलापुर, सेक्टर-7 बेलापुर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर, सेंट्रल पार्क, पेथापाड़ा, सेक्टर 34 खारघर, पंचनद और पेंढर टर्मिनल ही स्टेशन आहेत.