मनसे नेते गजानन काळे यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Gajanan Kale : नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही.  

Updated: Aug 25, 2021, 01:06 PM IST
मनसे नेते गजानन काळे यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा title=

मुंबई : Gajanan Kale wife filed complaint : नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court ) त्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, गजानन काळे यांनी अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात गजानन काळे यांनी धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळ्यानंतर काळे यांनी उच्च न्यायल्यात धाव घेतली.

गजानन काळे यांच्या पत्नीने आरोप केला आहे की तिचा छळ केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली. याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही तांत्रिक कारणाने सुनावणी स्थगित झाली असून 7 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे पीडितांच्या वकिलानी सांगितले आहे. 

गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमान्वये नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. त्याचबरोबर गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचाही आरोप पत्नीने नोंदवलेल्या FIR मध्ये केला आहे. 

2008 मध्ये आमचे लग्न झाले. लग्नानंतर 15 दिवसांनी गजानन माझासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सावळा रंग आणि माझी जात या कारणावरून मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करू लागला.  तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी गजानन याने मला मारहाण केली होती' असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.