मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 27, 2023, 12:32 PM IST
मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट title=

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई मडगाव (गोवा) वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे. मात्र त्याची बुकिंग कालपासून सुरु झाली आहे. मडगाव (गोवा) - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गोव्याची पहिली वंदे भारत एक्सप्रेस असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा सुमारे एक तासाचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे.

गणेशोत्सवासाठी वंदे भारतला प्रचंड प्रतिसाद

मुंबईकर चाकरमान्यांनीही गणेशोत्सवासाठी वंदे भारतला प्रचंड प्रतिसाद दिला असून 18 सप्टेंबरला आता वेटिंग लिस्ट लागली आहे. 530 सीटर वंदे भारतची 18 सप्टेंबरची सर्वच्या सर्व तिकिटं विकली गेली आहेत. 18 सप्टेंबरला EXECUTIVE कारसाठी 20 पेक्षा जास्त वेटिंग दाखवत आहे. तर चेअरकारची वेटिंग लिस्ट 140च्या पुढे गेली आहे. तेव्हा सणासुदीला या गाडीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर 'इतके' असणार, अधिक जाणून घ्या

असा असणार तिकिट दर

18 सप्टेंबरची प्रतिक्षा यादी 125 च्या वर पोहोचली आहे. मुंबई ते मडगाव या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट 1815  रुपये आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट 3360  रुपये आहे. दुसरीकडे, मडगाव ते मुंबई या मार्गासाठी वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट 1970  रुपये असून, एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट 3535 रुपये आहे. एवढे तिकीट दर असूनही गणेशोत्सवासाठी वंदे भारत ट्रेन फुल्ल झाल्यामुळे या ट्रेनचे प्रवाशांनी जोरदार स्वागत केल्याचे दिसून येत आहे.

पेण स्टेशन येथे विशेष गाड्यांना थांबा

दरम्यान, गणपती उत्सव विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. विशेष रेल्वेच्या 156 फेऱ्या मध्य रेल्वेने जाहीर केल्या होत्या. प्रवाश्यांची मागणी लक्षात घेता, मध्य रेल्वे खालील 80 फेऱ्यांना  पेण स्टेशन येथे थांबे जाहीर केले आहेत. 01171/72- CSMT-सावंतवाडी विशेष- 40 फेऱ्या आणि 01153/54- दिवा- रत्नागिरी विशेष- 40 फेऱ्या या गाड्यांना पेण येथे आता थांबा मिळणार आहे. 

मुंबई मडगाव वंदे भारत आजपासून धावणार

मुंबईहून गोव्याला आता सुपरफास्ट वेगात जाता येणारेय. कारण मुंबई मडगाव वंदे भारत आजपासून सुरु होणार आहे. 8 तासांत हे अंतर पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मडगाव-मुंबई वंदे भारतसोबत बिहार, झारखंड शहरांसाठी वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन 28 जूनपासून पावसाळ्यात आठवड्यातून तीन दिवस धावेल. तर पावसाळ्यानंतर 1 नोव्हेंबरपासून शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम इथं थांबे असतील.

मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे मान्सून वेळापत्रक

मुंबई ते मडगाव 

थांबे आणि वेळ

मुंबई CSMT

पहाटे 5 वाजून 25 मिनिटे

दादर

पहाटे 5 वाजून 32 मिनिटे

ठाणे

पहाटे 5 वाजून 52 मिनिटे

पनवेल

सकाळी 6 वाजून 30 मिनिटे

खेड

सकाळी 8 वाजून 48 मिनिटे

रत्नागिरी

सकाळी 10 वाजून 40 मिनिटे

कणकवली

सकाळी 12 वाजून 45 मिनिटे

थिविम

दुपारी 2 वाजून 24 मिनिटे

मडगाव (गोवा)

दुपारी 3 वाजून 30 मिनिटे

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे मान्सून वेळापत्रक

मडगाव ते मुंबई

थांबे आणि वेळ

मडगाव (गोवा)

दुपारी 12 वाजून 20 मिनिटे

थिविम

दुपारी 1 वाजून 6 मिनिटे

कणकवली

दुपारी 2 वाजून 18 मिनिटे

रत्नागिरी

सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटे

खेड

सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटे

पनवेल

रात्री 9.00 वाजता

ठाणे

रात्री 9 वाजून 35 मिनिटे

दादर

रात्री 10 वाजून 5 मिनिटे

मुंबई CSMT

रात्री 10 वाजून 25 मिनिटे