मुंबई-आग्रा महामार्ग कसारा घाटात दुभंगल्याने एकेरी वाहतूक

नाशिक ते कसाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून  राष्ट्रीय महामार्गप्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहे. 

Updated: Aug 5, 2019, 03:52 PM IST
मुंबई-आग्रा महामार्ग कसारा घाटात दुभंगल्याने एकेरी वाहतूक  title=

योगेश खरे, झी 24 तास, नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटाचा पाया खचू लागला आहे. मुंबईकडून नाशिक कडे येणाऱ्या रस्ता पूर्णपणे दुभंगला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणंसुद्धा अवघड झाला आहे. त्यात दुसर्‍या रस्त्यावर काल दरड कोसळल्यामुळे तीन तास हा रस्ता बंद ठेवावा लागला होता.

काम सुरू 

नाशिक ते कसाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून  राष्ट्रीय महामार्गप्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कसारा घाटातील दुभंगलेले रस्ते बुजवण्याचे काम सुरू केले आहे. तरी एका बाजूला काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला खड्डे पडण्याचं प्रकार सुरू असल्याने कसारा घाटातील काही भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.