अंबानी पुन्हा आजोबा बनले! सून श्लोकाने दिला दुसऱ्या बाळाला जन्म

अंबानी यांच्या सूनेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अंबानी यांची सून श्लोका आणि मुलगा आकाश यांना आधी एक मुलगा आहे. अंबानी कुटुंबात दुसऱ्या नातवंडाचे आगमन झाले आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 31, 2023, 06:49 PM IST
अंबानी पुन्हा आजोबा बनले! सून श्लोकाने दिला दुसऱ्या बाळाला जन्म   title=

Akash and Shloka Ambani second child: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि  रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukseh Ambani) पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत. आकाश अंबानी (Akash Ambani) याची पत्नी आणि अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहता पुन्हा एकदा आई बनली आहे. अंबानी यांच्या घरी बेबी गर्लचे आगमन झाले आहे. श्लोका मेहताने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. घरात आणखी एका लहान बाळाचे आगमन झाल्याने अंबानी कुटुंबियात आनंदाचे वातावरण आहे. 

श्लोका आणि आकाश अंबानी 2019 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना एक मुलगा  आहे. यानंतर श्लोकाने पुन्हा एकदा गोड बातमी दिली होती. अंबानी कुटुंबाची सून श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई झाली आहे.  अंबानी कुटुंबाने कल्चरल सेंटरच्या ओपनिंग पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी श्लोकाचे बेपी बंप पहायला मिळाले होते. ती पुन्हा गरोदर असल्याचे कळाले.  डिलीव्हरी आधी तिने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. अंबानी कुटुंब सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलं होतं. 

कोण आहे श्लोका मेहता?

श्लोका आणि आकाश हे बालपणीचे मित्र आहेत. श्लोका  दिग्गज हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे मार्च 2019 मध्ये लग्न झाले. 10 डिसेंबर 2020 रोजी श्लोकाने पहिल्या बाळाला जन्म दिला. श्लोकाला मुलगा झाला.  याचे नाव पृथ्वी असे ठेवण्यात आलेय पृथ्वी हे अंबानी कुंटुंबातील मोठ नातवंड आहे. 

अंबानी यांचे नातवंडासोबत गोड नातं

अंबानी हे मोठ बिजझमेन असले तरी ते आजोबांच्या भूमिकेत नातवंडासोबत लहान होतात. अंबानी यांचे नातवंडासोबत गोड नातं आहे. सूनेच्या डिलिव्हरीआधी मुकेश अंबानी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला घेवून गेले होते तेव्हा त्यांनी नातवाला कडेवर घेवून त्याचे चांगलेच लाड पुरवले होते. श्लोका मेहता बुधवारी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. यावेळी तिच्यासह पती आकाश अंबानी, सासरे मुकेश अंबानी आणि मुलगा पृथ्वी होता.  याचे फोटो व्हायरल झाले होते. यात अंबानी नावाला कडेवर घेवून फिरताना दिसत आहेत.