MSRTC Recruitment 2023: गेल्या काही महिन्यांपासून खासगी तसेच सरकारी विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनानंतर बहुतांश जग पूर्वपदावर आलेले असताना पुन्हा एकदा नवीन सुरुवात जोमाने व्हावी, यासाठी अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्या नोकरभरतीची प्रक्रिया राबवली जाते. यातच आता राज्याची लालपरी म्हणजेच गावागावात सेवा देणाऱ्या एसटीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना एसटी महामंडळाअंतर्गत नोकरी करण्याची संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर इथे जागा भरती निघाली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून अर्जाची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
वाचा: सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी, 'अमूल'चं दूध महागलं, 'असे' असतील नवे दर
एकूण पदे - 37
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) – 05 पदे
2) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder – 06 पदे
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician – 03 पदे
4) वेल्डर (गॅस व इले.) / Welder – 09 पदे
5) पेंटर (सामान्य) / Painter (General) – 02 पदे
6) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic – 12 पदे
अर्ज ऑनलाइन पद्धतीने शक्य
नोकरीचं ठिकाण - नागपूर
शैक्षणिक पात्रता - 10 वी पास, 12 वी पास, आयटीआय, डिप्लोमा यापैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
परीक्षा फी - नाही.
www.msrtc.gov.in या अधिकृत वेबसाइट वर अर्जासंबंधीत सर्व माहिती उपलब्ध आहे.