'MPSC'चा निकाल जाहीर, पुण्याचा प्रमोद चौगुले पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

Updated: Apr 29, 2022, 11:10 PM IST
'MPSC'चा निकाल जाहीर, पुण्याचा प्रमोद चौगुले पहिला title=

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाने मुलाखतीनंतर अवघ्या काही तासातच हा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत पुणेकर प्रमोद चौगुलेने (Pramod Chaugule Mpsc) बाजी मारली आहे. प्रमोदने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नितेश कदमने दुसरा आणि रूपाली मानेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. (mpsc maharashtra public servcie commission annouce main exam results announced pramod chowgule tops)

मुलाखती 18 तारखेपासून सुरु होत्या. या सुरू असलेल्या मुलाखती आज संपल्या. मुलाखती संपून काही तास ओलांडत नाहीत, त्या आताच आयोगाने  निकाल जाहीर केले. या परीक्षेद्वारे वर्ग एकची पदं भरण्यात येणार आहेत.दरम्यान प्रमोद चौगुलेने अव्वल क्रमांक पटकावल्याने त्याचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. 

आयोगाने तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी या पदांसाठी डिसेंबरच्या  4,5 आणि 6 तारखेला मुख्य परीक्षा घेतली. त्यानंतर 200 जागांसाठी 597 उमेदवारांची निवड करण्यात आली. 

आयोगाने या मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या 579 उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं. या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेतील गुणांची यादी आयोगाने आधीच तयार ठेवल्या होत्या. 

सर्व मुलाखती पार पडल्या. त्यानतंर मुलाखत घेणाऱ्या पॅनेलने गुणांची यादी दिली. पॅनेलने दिलेले गुण आणि मुख्य परीक्षेतील गुणांची बेरीज करण्यात आली. यानंतर आयागोने झटपट निकाल लावला.