MPSC Exams News : मनाजोगं शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी हे सगळं असूनही अनेकदा तरुणाईचा कल सरकारी नोकऱ्यांकडे दिसून येतो. महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं अशीही तरुणाई आहे, जी याच सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी, मोठ्या हुद्द्यावर नियुक्त होत कर्तव्य बजावण्यासाठी धडपडकाना दिसते. अशा या तरुणाईसाठी ही बातमी महत्त्वाची. कारण, Maharashtra Public Service Commission (MPSC) अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी आहे.
MPSC मेगा भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. 8 हजार 169 जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातील जवळपास 97 जिल्हा केंद्रावर पार पडणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवार ठरतील.
30 एप्रिल, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 ही 2 सप्टेंबर, तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 ही 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. इच्छुकांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी MPSC च्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी. 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान अर्ज करता येणार आहेत.
तांत्रिक सहायक पदासाठी 29200- 92300 वेतन (1 जागा)
कर सहायक पदासाठी 25500- 81100 वेतन (468 जागा)
लिपिक-टंकलेखक पदासाठी 19900- 63200 वेतन (7034 जागा)
राज्य कर निरीक्षक पदासाठी 38600- 1,22,800 वेतन (159 जागा)
पोलिस उपनिरीक्षक पदासाठी 38600- 1,22,800 वेतन (374 जागा)
दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी 38600- 1,22,800 वेतन (49 जागा)
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी 32000- 1,01,600 वेतन (6 जागा )
सहायक कक्ष अधिकारी पदासाठी 38600- 1,22,800 इतकं वेतन असेल. (15 जागा)