MPSC परिक्षासंदर्भात मोठी बातमी, परीक्षेपूर्वीच 90 हजारांपेक्षा जास्त हॉल तिकीट व्हायरल

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच (MPSC Exam 2023 ) परिक्षा 30 एप्रिल 2023 ला होणार आहे. मात्र त्यापूर्वीचा या स्पर्धा परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाल्याची बातमी समोर येत.

श्वेता चव्हाण | Updated: Apr 23, 2023, 01:37 PM IST
MPSC परिक्षासंदर्भात मोठी बातमी, परीक्षेपूर्वीच 90 हजारांपेक्षा जास्त हॉल तिकीट व्हायरल title=
MPSC exam hall ticket viral

MPSC Hall Ticket 2023 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच (MPSC Exam 2023 ) परिक्षा 30 एप्रिल 2023 ला होणार आहे. मात्र त्यापूर्वीचा या स्पर्धा परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाल्याची बातमी समोर येत. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, आणि क च्या परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाले. एका टेलिग्राम चॅनलवर 90 हजारांपेक्षा जास्त हॉल तिकिट अपलोड करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर आयोगाने सायबर पोलिसात दाखल केली आहे.

दरम्यान, 30 एप्रिल 2023 ला होणार्‍या MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षे गट 'ब', 'क'च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक करण्यात आले आहे. यामध्ये लाखो विद्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हॉलतिकीट हॅक झाली आहे. विद्यार्थ्यांची हॉल तिकीट टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आली आहे. तसेच या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.  

आता पेपर कधी होणार? 

संयुक्त पूर्वपरीक्षा 30 एप्रिल 2023 ला होणार आहे. यापूर्वी पेपर आणि हॉल तिकीट फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणानंतर सायबर पोलीस येऊन त्याचा तपास करतील. सत्यता पडताळल्यानंतर वेळापत्रकानुसार पेपर कधी होणार हे निश्चित होईल. यासाठी 4-5 दिवस वाट पाहावी लागणार आहे. 

विद्यार्थी संताप्त 

हॉल तिकीट हॅक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एमपीएससी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि नेटकरी नाराज झाले आहेत. हे विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करतात. शिंदे-फडणवीस सरकार याबाबत प्रश्न विचारत आहे. सरकार काय झोपा काढतयं का? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे.