मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार? स्वत: राजेंनी दिले संकेत

Udayanraje Bhosle : खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपली निवडणूक लढवण्याची हौस पूर्ण झाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सल्ला दिला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 13, 2023, 09:09 PM IST
मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार?  स्वत: राजेंनी दिले संकेत title=

Udayanraje Bhosle : साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे संकेत दिले आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले माझी निवडणूक लढलण्याची खाज भागली आहे, त्यामुळे बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली हे समजलंच नाही, असं उदयनराजे (Uaydanraje Bhosle) यांनी म्हटलं आहे. राजकारणात रिटायरमेंटचं पण वय असेल पाहिजे असं सांगत शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आता मार्गदर्शकाची भूमिका बजावावी असा सल्ला देखील यावेळी खा.उदयनराजे यांनी दिला आहे. सातारा नगरपालिकेबाबत शिवेंद्रराजेनी (Shivendraraje) केलेल्या टीकेला उत्तर देताना सातारा नगरपालिकेची ईडी ची चौकशी लावावी असा उपरोधक टोला त्यांनी लगावला.

शासनात जसं निवृत्तीचं वय असतं तसं राजकारणातही निवृत्तीचं वय असावं, राजकारण्यांनाही हे  लागू पाहिजे असं उदयनराजे यांनी म्हटलंय. प्रत्येकजण म्हणतं लोकांचा आग्रह होता म्हणून मी निवडणूक लढतो, पण हे कुठेतरी थांबायला हवं. शरद पवार यांनी आता मार्गदर्शक म्हणून असावे असे मला वाटते. त्यांनी मुख्यमंत्रीपदासह केंद्रातही सर्व पदं भोगली, त्यांनी आता मार्गदर्शक भूमिकेत असलं पाहिजे असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. 

आरक्षणावर भूमिका
मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलताना उदयनराजे यांनी कायद्याप्रमाणे लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्या असं म्हटलं आहे. बाकिच्या समाजाला तुम्ही आरक्षण देता, देवाने सर्वांना समान बुद्धी दिलेली नाही, खरी चुकी त्यावेळच्या राज्यकर्त्यांची आहे. त्यावळी मंडळ आयोग होतं, त्यांनी मागासवर्गीयांचं चुकीचं विश्लेषन केलं. व्यक्ती कोणत्याही जातीची असु द्या आर्थिकदृष्ट्या दुर्लभांना सहकार्य करा असं मतही उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे. जालनात शनिवारी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarane-Patil) यांची भव्य सभा होणार आहे, आपण जालनाला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

कुणबी मराठा ही जात आपल्याया मान्य नाही, एखाद्या  एक्स वाय झेडला मागासवर्गिय म्हणायचा अधिकार कोणी दिला, मी मोठा तू हलका, एव्हढ करायचं असेल तर रक्त लावताना कोणाचं रक्त का पाहिलं जात नाही असा सवालही उदयनराजे यांनी उपस्थित केला.

काँग्रेसकडून जातीनियाह गननेची मागणी केली जात आहे, पण त्यांनी फक्त व्होटबँक बघितली तर लोकं कदर करणार नाहीत अशी टीका उदयनराजे यांनी केलीय.