नगर : सासु सुनांचे भांडण कोणत्या घराला नविन नाही. सासु-सुनेच्या भांडणात बऱ्याचदा मुलाची कोंडी होते असे म्हटले जाते. पण या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी कोणत्या मुलाने स्वत:च्या आईला जिवंतपणी स्मशानाचा रस्ता दाखविला तर ?
यापेक्षा दुर्देवी गोष्टी ती कोणती ? अशीच एक दुर्देवी घटना नगर जिल्ह्यातून समोर आली आहे. दै. सामना ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
ज्या आईने जन्म दिला, लहानाचे मोठे केले त्या आईला मुलाने स्मशानात नेऊन सोडले. लक्ष्मीबाई आहुजा असे या दुर्देवी मातेचे नाव आहे. एवढ सर्व होऊनही मुलगा वाईट नाही मात्र सुनेसोबत खटके उडत असल्याने त्याने असे केल्याचे सांगत लक्ष्मीबाई आपली कहाणी सांगतात.
मृत शरीराला अग्नी देण्याचे ठिकाण म्हणजे स्मशान. पण लक्ष्मीबाईंच्या मुलाच्या अशा कृत्यामूळे त्यांच्यावर जिवंतपणीच मरण यातना भोगण्याची वेळ आली आहे.
माऊली नावाच्या सामाजिक संस्थेने लक्ष्मीबाईंना निवारा दिला. त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय केली. त्यावेळी लक्ष्मीबाईंनी आपल्यावर स्मशानात राहण्याची वेळ का आली याबद्दल माहिती दिली.