लग्नासाठी व्हॅलेंटाईनडे पेक्षाही 'एक बेस्ट दिवस'

लष्करातील जवानचा खास दिवस असतो तो शौर्य दिवस किंवा बटालीयनचा स्थापना दिवस.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2018, 12:16 PM IST
लग्नासाठी व्हॅलेंटाईनडे पेक्षाही 'एक बेस्ट दिवस' title=

शिर्डी : मुहुर्तावर लग्न करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्यात लग्नासाठी ब-याचदा व्हेलेंटाईनडेसारख्या खास दिवसाची निवड केली जाते. मात्र लष्करातील जवानचा खास दिवस असतो तो शौर्य दिवस किंवा बटालीयनचा स्थापना दिवस.

विवाह सोहळा कोपरगाव तालुक्यातील येसगावला

नेमका याच दिवसाचं औचित्य साधत भारतीय सैन्यातील मुलीचे सेवानिवृत्त सैनिक हवालदार कैलासराव किसनराव आहेर यांची कन्या नुतन आणि सेवानिवृत्त सुभेदार गोरख यमनराव ढमक यांचे  चिरंजीव शिवराज यांचा विवाह सोहळा कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे पार पडलाय.

11 फेब्रवारी हा 21 प्यारा बटालीयनचा स्थापना दिवस

11 फेब्रवारी हा 21 प्यारा बटालीयनचा स्थापना दिवस, हा स्थापना दिवस या लग्न सोहळ्यातच साजरा करण्यात आलाय. या सोहळ्यात या बटालीन मध्ये असलेले जवानही उपस्थीत होते. या लग्न सोहळ्यात शौर्य पदक प्राप्त सैनिकांचा आणि विरगती प्राप्त सैनिकांच्या कुटुबीयांना सन्मानीतही करण्यात आलं.