Rain : राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

Rain ​News : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.  

Updated: Nov 23, 2021, 08:08 AM IST
Rain : राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता title=

मुंबई : Rain ​News : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. (Rain ​in  Maharashtra) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (More rain forecast for Maharashtra during next two Day)

राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुढील 24 तासांत पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे. 

दरम्यान, जोरदार पावसामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल सोयाबीन भिजले आहे. शेतकऱ्यांचा विकायला आणलेला सोयाबीन उघड्यावरच ठेवलेला होता. ओट्यावर ठेवलेला काही शेतकऱ्याचा माल पावसात वाहून केला. तर अनेकांचे सोयाबीन भिजले. त्यात काही वेळ लिलाव शेतकऱ्यांनी बंद पडला. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळं इथं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.