Monsoon in Maharashtra : मान्सूनचं कोकण, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमन

उकाड्यामुळे हैराण झालेल्या आणि पावसाची वाट बघणाऱ्या राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी

Updated: Jun 5, 2021, 11:17 PM IST
Monsoon in Maharashtra : मान्सूनचं कोकण, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमन  title=

मुंबई : उन्हाळ्यामुळे राज्यातील (Monsoon Comes In Maharashtra) जनतेची लाहीलाही झाली. मात्र आता राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वांना हवाहवासा असणार पाऊस राज्यात दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील विविध भागात काही दिवसांपासून पाऊस बरसत होता. या आधारावर हवामान विभागाने राज्यात येत्या 2 दिवसात पाऊस दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरताना दिसतोय. मान्सून सक्रीय होणार असल्याने शेतीकामांना वेग आला आहे. मुंबई केंद्राचे उपमहानिदेशक के.एस. होसालीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Monsoon in South Central Maharashtra and Marathwada including West Konkan in Maharashtra, information of India Meteorological Department)      

दक्षिण कोकणातील हर्णे ते दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापुरात मान्सूनने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रीय झाला आहे. राज्यात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यानंतरही मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण एकूणच शेतीसाठी पूरक असा पाऊस बरसणार असल्याचं म्हणण्यात येत आहे.

मुंबईत 2 दिवसांनी बरसणार

महाराष्ट्रासह मुंबईत पाऊस केव्हा दाखल होणार, याकडे सर्व मुंबईकराचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान मान्सून मुंबईत अवघ्या 2 दिवसांनंतर दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मागील 6 वर्षात मान्सून उशिरा दाखल होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.