आला रे आला... मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, सरासरी जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update News :पावसासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत आला असला तरी ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होणार आहे. 

Updated: Jun 3, 2022, 07:38 AM IST
आला रे आला... मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, सरासरी जोरदार पावसाचा अंदाज title=

मुंबई : Monsoon Update News :पावसासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत आला असला जून महिन्यात कमीच पावसाचा अंदाज आहे. (Monsoon in Maharashtra) वाऱ्याचा वेग मंदावल्याचा हा परिणाम आहे. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होणार आहे. 

भारतीय हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. 

कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या विस्तारित अंदाजानुसार दुसऱ्या आठवडय़ापासून म्हणजे 10 जूनपासून पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर पाऊस वाढण्याची शक्यता आहे.