अहमदनगर: गोरक्षकांवर ५० जणांच्या जमावाचा हल्ला

  काठ्या आणि धारधार शस्त्रांच्या सहाय्याने सुमारे 50 जणांच्या जमावाने गोरक्षावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात गोरक्षक जखमी झाले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 6, 2017, 02:54 PM IST
अहमदनगर: गोरक्षकांवर ५० जणांच्या जमावाचा हल्ला title=

अहमदनगर:  काठ्या आणि धारधार शस्त्रांच्या सहाय्याने सुमारे 50 जणांच्या जमावाने गोरक्षावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात गोरक्षक जखमी झाले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हल्ला झालेल्या गोरक्षांनी हल्ला होण्याआधी पोलीसांच्या साथीने गुरांची अवैध वाहतूक करणारा एक टेम्पो पकडला होता. या वेळी कारवाई करत पोलीसांनी टेम्पो मालक वाहिद शेख याच्यासह चालक राजू फत्रुभाई शेख या दोघांना ताब्यात घेतले. पोलीसांनी कायदेशीर कारवाई करत महाराष्ट्र पशू संरक्षण कायद्यातंर्गत दोघांवरही गुन्हे दाखल केले. दरम्यान, पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर, जवळपास 50 जणांचा समुह हातात काठ्या आणि धारधार शस्त्रे, दगड घेऊन चालून आला. या जमावाने गोरक्षकांवर हल्ला केला. यात सात गोरक्षक जखमी झाले. पोलीसांनी याही घटनेची वेळीच दखल घेत संबंधितांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पुण्यातील शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी दिलेल्या माहिती आणि केलेल्या दाव्यानुसार, काही गोरक्षकांसह स्वामी हे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात आठवडी बाजाराच्या ठिकाणी गेले होते. सरकारकडून प्राणीमित्र म्हणून नियुक्ती झाल्याचा स्वामी यांचा दावा आहे. पशूंची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरोधात आतापर्यंत आपण 300 तक्रारी केल्याचे स्वामी सांगतात. यामुळे आपल्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता आपण पुण्यात असताना आपल्याला 12 तास पोलीस संरक्षण दिले जाते, असेही स्वामी सांगतात.

दरम्यान, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे सदस्य असलेले स्वामी हे आपल्या गोरक्षांच्या 11 जणांच्या पथकासह शनिवारी काष्टीच्या बाजाराला गेले होते. या आठवडी बाजारात ते नेहमीच जात असतात. या ठिकाणी कत्तलखान्यात नेण्यासाठी गायींची अवैध विक्री आणि वाहतूक असे, यावर नजर ठेवण्यासाठी आपण येथे येत असल्याचा स्वामी यांचा दावा आहे. आम्हाला एका टेम्पोतून गुरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही श्रीगोंदा पोलिसांना याबद्दल कळवले होते, अशी माहिती स्वामी यांनी दिली आहे.

दरम्यान, स्वामी यांनी म्हटले आहे की, साधारण दुपारी एकच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने दौंड-अहमदनगर मार्गावर हॉटेल तिरंगाच्याजवळ आम्ही एक टेम्पो आडवला. त्या टेम्पोत 10 बैल आणि दोन गायी होत्या. यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन या सगळ्याची रितसर तक्रार दाखल केली. तक्रार करून बाहेर पडल्यावर आम्हाला भूक लागील. त्यामुळे आम्ही एका हॉटेलात गेलो. तेव्हा त्या ठिकाणी शस्त्र घेऊन काहीजणांचा जमाव उभा होता. आम्हाला शंखा आल्याने आम्ही पुन्हा पोलीस ठाण्यात गेलो आणि वाहिद शेख आणि चालक राजू फत्रुभाई शेख यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. हे दोघेजण हमालवाडा येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी गुरे नेत असल्याचा शिवशंकर स्वामी यांचा आरोप आहे.

दरम्यान, आपल्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले असता जमावाने हल्ला केला. हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनही हिसकावल्या. या मारहाणीत आमचे कार्यकर्ते जखमी झाल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.