'व्हॅलेंटाईन डे ला विरोध करण्यापेक्षा...'- राज ठाकरे

राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर

Updated: Feb 14, 2020, 01:37 PM IST
'व्हॅलेंटाईन डे ला विरोध करण्यापेक्षा...'-  राज ठाकरे  title=

औरंगाबाद : व्हॅलेंटाईन डे ला विरोध करण्यापेक्षा महिलांवरील अत्याचाराकडे लक्ष द्या असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून स्थानिक पत्रकारांशी त्यांनी अनौपचारीक संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबाद नामकरणावरही भाष्य केले. औरंगाबादचे संभाजीनगर होत असेल तर त्याच वावग काय ? असेही ते म्हणाले. 

झेंडा बदलला पण भूमिका बदलल्याचा पुनरोच्चार राज ठाकरेंनी यावेळी केला. निवडणुकांवेळी राजमुद्रा दिसणार नाही तर रेल्वे इंजिन दिसेल असेही त्यांनी सांगितले. 

तसेच कोरेगाव-भीमाचा तपास झालाच पाहीजे असेही ते यावेळी म्हणाले. 

औरंगाबादच्या नामांतराला हरकत काय आहे? अनेक जण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस औरंगाबादेत मुक्कामी आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे औरंगाबादेत मुक्कामी येणार असल्यानं शहरातील प्रमुख चौकात त्यांना ‘हिंदू जननायक’ अशी बिरुदावली लिहिली आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता मला हिंदू जननायक म्हणून नका, असे ते म्हणाले.

तर मनसेच्या झेंड्यात केवळ बदल झालाय. भूमिका बदललेली नाही. हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांनी कधी भूमिका घेतली का? असा प्रश्न राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला. तसंच नव्या झेंड्याबाबात कुठलीही नोटीस आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

शरद पवारांशी तुमचे संबंध अजूनही चांगले आहेत का? या प्रश्नावर त्यांनी मिश्किलपणे  अजूनही चांगले राजकीय संबंध असल्याचं म्हटलंय.