हा कसला प्रवेश?; शिंदे गटाकडून फसवं फोटो सेशन, मनसेचा आरोप

MNS allegation - fraudulent photo session by Shinde group :पनवेलमधून जवळपास 100 मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश (Shinde group entry) केल्याचा दावा मनसेने फेटाळून लावला आहे.  

Updated: Aug 3, 2022, 11:21 AM IST
हा कसला प्रवेश?; शिंदे गटाकडून फसवं फोटो सेशन, मनसेचा आरोप title=

नवी मुंबई : MNS allegation - fraudulent photo session by Shinde group :पनवेलमधून जवळपास 100 मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश (Shinde group entry) केल्याचा दावा मनसेने फेटाळून लावला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून फसवणूक झाल्याचा दावा पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी केला आहे. मनसेच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना फसवून तिथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांचा शिंदे यांच्याबरोबर फोटो काढण्यात आला, असे चिले यांनी म्हटले आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व्हिडिओ चिले यांनी प्रसिद्ध केला आहे. 

शिंदे गटाने पनवेलमध्ये मनसेला खिंडार पाडल्याचे वृत्त मनसेकडून फेटाळण्यात आले आहे. पनवेल, उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि त्याचे फोटो व्हायरल झालेत. (MNS leaders and activists joined the Shinde group) रात्री उशिरा मुंबईतील मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात मनसे कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. मात्र, मनसेकडून याचा इन्कार करण्यात आला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी फसवणून त्यांचे फोटो काढल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. 

मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब , उरण आणि पनवेलमधील मनसे खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात दाखल झाली, असे सांगण्यात आले. त्यानंतर मनसेचे नेते योगेश चिले यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.